श्रीमंत शंभू सिंह महाराज हायस्कूल शिवनगर च्या माजी विद्यार्थ्यांचा रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी सुवर्ण महोत्सव स्नेह मेळावा

  बारामती . श्रीमंत शंभू सिंह महाराज हायस्कूल शिवनगर च्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सव स्नेह मेळावा  बारामती तालुक्यातील माळेगाव येथील श्रीमंत शंभू सिंह महाराज हायस्कूल शिवनगर या शाळेच्या १९७५ च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सव मेळावा शेतकरी निवास कृषी विज्ञान केंद्र शारदा नगर बारामती येथे रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याचे अध्यक्ष केशवराव जगताप चेअरमन माळेगाव सहकारी साखर कारखाना,उपाध्यक्ष शिवनगर विद्या प्रसारक मंडळ आणि माळेगाव सहकारी कारखान्याचे संचालक रंजन कुमार तावरे व शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव प्राध्यापक धनंजय ठोंबरे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी शंभू सिंह महाराज हायस्कूलच्या गुरुजनांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून १९७५ च्या एसएससी बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत .श्रीमंत शंभू  सिंह महाराज हायस्कूल शिवनगर या संस्थेचा सुवर्ण महोत्सव असून यानिमित्त या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा

बारामतीत भर दुपारी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फसला