बारामतीत भर दुपारी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न फसला
बारामतीत भर दुपारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या प्रतिकारामुळे व आरडाओरडा केल्याने चोरटा पळून गेला. सहा जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता चे सुमारास तांदुळवाडी रोड गुरुकृपा कॉलनी येथे पार्लर वरून घरी जात असताना महिलेच्या स्कुटीच्या मागून होंडा शाईन मोटरसायकल वरून चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला महिलेने प्रसंगावधान राखल्यामुळे आरडा ओरडा केल्यामुळे लोक जमा झाले शाईन मोटरसायकल एम एच 42 42 89 यावरून चोरटा पळून गेला बारामती तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हवालदार टिळेकर करीत आहेत
Comments
Post a Comment