अवैध प्रवासी वाहतुकीला बारामती वाहतूक पोलिसांचा 'दणका

अवैध प्रवासी वाहतुकीला बारामती वाहतूक पोलिसांचा 'दणका चार खाजगी वाहनांवर कारवाई; वाहनांविरोधात भरले खटले बारामती दि.०६ पोलीस प्रशासन आणि वाहतूकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरु असलेल्या खाजगी अवैध वाहतुकीला आता बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. चार प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर न्यायालयात खटले पाठविले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. बारामती बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या अवैध प्रवाशी वाहनांवर कारवाई केली असून त्यामध्ये मारुती सुझुकी इको (एम.एच.४२ बी.जे ३८७८), मारुती ओमीनी (एम. एच.१२ एच.व्ही. ४८३२), मारुती सुझुकी इको (एम.एच. ४५ ए. यु.०५८५) महिंद्रा ऍपे (एम.एच.१२ जे.यु.१२५० अशा एकूण चार वाहनांचा समावेश आहे. पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या अनुचित प्रकारानंतर आता बारामतीच्या वाहतूक शाखेनही कंबर कसली आहे. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती बसस्थानक परिसरात वाहतूक पोलीसांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक नियमांना आणि महिला सुरक्षेल...